दिनेश सोनवणे
दौंड : दौंड शहरातील भीमा नदी सद्या दुथडी भरून वाहत असून नदी काठी असणारे महादेवाचे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे. नदीच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. दौंड विसर्ग- शनिवार दि १७ रोजी सकाळी ८ वाजता. ८१,५४८ क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे. तर ५०२.४४ मीटर पाणी पातळी शनिवारची आहे.
पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणे पूर्ण क्षमतेने भरले असून धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने, भीमा नदी दुथडी भरुन वाहत आहे. भीमा नदी ही दौंड शहराच्या हद्दीतून वाहत असून नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे.
दरम्यान, धोक्याची पूर पातळी ५०५ मीटर, दौंड शहरासाठी इशारा पूर पातळी ही ५०४ मीटर असून धोक्याची पूर पातळी ५०५ (१५८२६४ क्यूसेक) मीटर आहे. सरासरी पाऊस एवढा दौंड तालुक्यात १ जून ते ऑगस्ट ३१ या कालावधीत सरासरीच्या १५८.९०% पाऊस पडला आहे.
दरम्यान, दौंड तालुक्यात १ जून ते ३१ ऑगस्ट या कालावधीत २१४. २० मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तीन महिन्यात मिळुन ३४०.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.