युनूस तांबोळी
शिरुर – जागतिक कन्या दिवसाचे औचीत्य साधून मॅजिक बस इंडिया फौंडेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र हाजी यांच्या संयुक्त विद्यमाने टाकळी हाजी , (ता शिरूर) येथील बापूसाहेब गावडे विद्यालय या विद्यालयात किशोरवयीन मुलींचे आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, इ विषयांच्या माहितीचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले.
“मुलींचे आरोग्य चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी विशेषत: किशोरवयीन मुलींनी आपल्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच या विषयाबाबत मुलींनी आपली आई,बहिण किंवा आपल्या शिक्षिका यांच्याशी खुलेपणाने संवाद साधला पाहिजे”.असे मत मुलींना मार्गदर्शन करताना शाळेचे मुख्याध्यापक आर .बी.गावडे यांनी व्यक्त केले.
सुनिता गावडे जि.प. सदयसा यांनी विद्यार्थीनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ प्रियांका घुगे यांनी विद्यार्थिनीना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, मासिक पाळी ही मातृत्वाची पहिली व आवश्यक पायरी असून, तिची भीती बाळगण्याचे काहीही कारण नाही. उलट स्त्रीला मिळालेले ते एक वरदान आहे. त्यामुळे कोणत्याही संकोचाविना ते स्त्रीने आनंदाने स्विकारावे.
या काळात आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून स्वच्छतेची व पुरेशा विश्रांतीची गरज असते. या काळात सदैव सॅनिटरी नॅपकिनचा वापर करावा, असा सल्ला देतानाच त्यांनी किशोरींना वयानुसार होणारे शारीरिक बदल, तसेच आरोग्याची निगा राखण्याबाबत विस्तृत मार्गदर्शन केले. ” किशोरवयीन मुलींच्या आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता माहिती विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेविका ईश्वरी घोडे ,किरण गव्हाणे, कौस्तुभ लावंड, अविनाश बच्चे,राजेंद्र पिंगळे,प्रवीण मिडगुले,रविंद्र शेळके,गणेश पवार,किरणकुमार इंगळे, निलेश पोपळघट, आशा बोखारे,बापूसाहेब गावडे विद्यालयचे शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मॅजिक बसचे प्रमुख उमेश साळवे यांनी केले. तसेच आभार कल्याणी जाधव यांनी केले.