पुणे : तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात? तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. आपल्यापैकी काही जणांनी अनेक परीक्षा, मुलाखतीही दिल्या असतील तरीही काहीवेळा नोकरी मिळण्याची ही संधी हुकतेच. मात्र, अजूनही तुम्ही चांगल्या नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे.
जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधीच असणार आहे. वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथे डॉक्टर, कार्यकारी अभियंता (सिव्हिल), नर्स, वसतिगृह व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सुतार, लिपिक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या 9 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 ही असणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 20000 ते 115000 पर्यंत पगार मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
http://www.vjti.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
महत्त्वपूर्ण माहिती थोडक्यात…
कोणत्या पदांवर भरती?
डॉक्टर, कार्यकारी अभियंता (सिव्हिल), नर्स, वसतिगृह व्यवस्थापक, सुरक्षा अधिकारी, सुतार, लिपिक
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : चीफ रेक्टर कार्यालय, व्हीजेटीआय वसतिगृह, वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (व्हीजेटीआय), माटुंगा (पूर्व), मुंबई-19.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2025
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 12, 13 आणि 14 मे 2025.