SBI Clerk Recruitment 2023 : स्टेट बॅंक ऑफ इंडिया कडून क्लार्क या पदासाठी अर्ज करण्याकरिता दिलेली अंतिम मुदत वाढवली असून 10 डिसेंबर 2023 पर्यंत उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यासाठी उमेदवारांना sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागणार आहे.
दरम्यान एसबीआय मध्ये 8283 Junior Associate या पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले असून उमेदवारांना यासाठी परीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. प्रिलिम एक्झाम जानेवारी 2024 मध्ये होणार असून मुख्य परीक्षा फेब्रुवारी 2024 मध्ये होण्याची शक्यता आहे. या संभाव्य तारखा आहेत. अधिकृत वेबसाईटवर परीक्षेची तारीख योग्य वेळी जाहीर केली जाणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.
या भरतीसाठी उमेदवार किमान ग्रॅज्युएट असावा. कोणत्याही शाखेचा पदवीधर अर्ज करू शकणार आहे. मात्र, पदवी मान्यताप्राप्त विद्यापीठातून असणं आवश्यक आहे, तर अर्ज करणार्या उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्ष असणं आवश्यक आहे.
असा करा अर्ज?
- sbi.co.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- होमपेजवर असलेल्या करियर या सेक्शन वर क्लिक करा.
- आता एक नवीन पेज उघडेल. या पेजवर SBI Clerk Recruitment 2023 ची लिंक दिसेल.
- आता तुमचे रजिस्ट्रेशन डिटेल्स त्यामध्ये सबमीट करा.
- तुमचा अॅप्लिकेशन फॉर्म भरा आणि फी भरून पेमेंट करा.
- तुमची अॅप्लिकेशन फी भरल्यानंतर फॉर्म डाऊनलोड करण्याचा पर्याय दिसेल.
- आता हार्ड कॉपी तुमच्याजवळ असेल.
- अर्ज करताना जे उमेदवार जनरल, ओबीसी, ईडब्यूएस कॅटेगरी मधील असतील त्यांना 750 रूपये फी असणार आहे. तर एससी,
- एसटी, पीडब्लूबीडी, ईएसएम, डीईएसएम मध्ये असतील त्यांना फी माफ केली जाणार आहे.