नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँकेकडून घेण्यात आलेल्या लिपिक पदांच्या मुख्य परीक्षेच्या निकालाबाबत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. या परीक्षांचे निकाल कधीही जाहीर केले जाऊ शकतात. लिपिक भरती परीक्षेला बसलेले उमेदवार विभागाच्या अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जाऊन निकाल पाहू शकतात.
लिपिक भरतीची मुख्य परीक्षा 25 फेब्रुवारी आणि 4 मार्च 2024 रोजी घेण्यात आली होती. या भरती परीक्षेद्वारे 8283 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. रिक्त पदांपैकी 3515 अनारक्षित आहेत. 1284 SC, 748 ST, 1919 OBC आणि 817 EWS प्रवर्गासाठी राखीव आहेत.
असा पाहता येईल ऑनलाईन निकाल…
1. सर्व प्रथम अधिकृत वेबसाईट sbi.co.in वर जा.
2. येथे होमपेजवर दिलेल्या निकालाच्या लिंकमध्ये अंतिम निकालावर क्लिक करा.
3. त्यानंतर एक PDF उघडेल.
4. आता तुम्ही त्यात तुमचा रोल नंबर तपासू शकता.
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भाषा परीक्षेसाठी बोलावले जाईल. कोणत्याही प्रकारची मुलाखत फेरी होणार नाही, असेही सांगण्यात आले. निवड झालेल्या उमेदवारांना मेसेजच्या माध्यमातून माहिती दिली जाणार आहे.