पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड केली जाणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथे मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर येथे जाऊन मुलाखत द्यावी लागणार आहे.
या भरती प्रक्रियेत 26 सप्टेंबर 2024 रोजी मुलाखत घेतली जाणार आहे. एमबीबीएस असणे यासाठी गरजेचे आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nagpurzp.com/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.