पुणे : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला नोकरीची माहिती देणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव येथे वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट आणि मानसोपचार परिचारिका या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला जळगाव येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 47 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), ऑडिओलॉजिस्ट कम स्पीच थेरपिस्ट, फिजिओथेरपिस्ट आणि मानसोपचार परिचारिका.
– एकूण रिक्त पदे : 47 पदे.
– नोकरीचे ठिकाण : जळगाव.
– शैक्षणिक पात्रता : फिजिओथेरपीमध्ये पदवीधर पदवी, ऑडिओलॉजीमधील पदवी., डी.पी.एन. / एम. एससी. किंवा बीएस्सी, एम.बी.बी.एस.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 20,000/- ते रु. 60,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन इमारत), जिल्हा परिषद, जळगाव.