पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव येथे अनेक रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जळगाव येथे डीईआयसी व्यवस्थापक, क्यूए समन्वयक, जिल्हा सल्लागार एनटीसीपी, जिल्हा कार्यक्रम समन्वयक–एनसीडी, सुविधा व्यवस्थापक-ई – एचएमआयएस (अंमलबजावणी अभियंता), एमओ–आयुष पीजी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक, एमबीबीएस/बीएएमएस या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला जळगाव येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 67 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यात 18 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे.
यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार असून, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन इमारत), जिल्हा परिषद, जळगाव या पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://zpjalgaon.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.