पुणे : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण, रेल विकास निगम लिमिटेड येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 21 एप्रिल, 2025 या दिवशी मुलाखत घेतली जाणार आहे.
रेल विकास निगम लिमिटेड येथे प्रकल्प व्यवस्थापक, उप प्रकल्प व्यवस्थापक (वायडक्ट), स्थापत्य अभियंता, इंटरफेस व्यवस्थापक, कामगार कल्याण अधिकारी या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुणे येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत सहा रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही रेल्वे विकास निगम लिमिटेड, पहिला मजला, प्लॉट क्रमांक 38, डी 1, ब्लॉक, आर. डी. आगा मार्ग, चिखली, आकुर्डी रोड, पुणे येथे घेतली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रकल्प व्यवस्थापक, उप प्रकल्प व्यवस्थापक (वायडक्ट), स्थापत्य अभियंता, इंटरफेस व्यवस्थापक, कामगार कल्याण अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 06 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– वयोमर्यादा : 45 वर्षे.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 21 एप्रिल 2025 सकाळी 10 वाजता.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://rvnl.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.