पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 37 रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकतो.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक.
– एकूण रिक्त पदे : 37 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, पीएच.डी./ नेट/ सेट
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्राचार्य/डीन/संचालक, सुधा सुरेशभाई मणियार कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड मॅनेजमेंट, प्लॉट नं.B,103/1-2, मौजा, चिखली EIA स्ट्रीट कळमना मार्केट रोड, कळमना ता.- नागपूर शहर, जि.- नागपूर – 440035.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.nagpuruniversity.org/ वरून माहिती घेता येणार आहे.