Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र पोलीस दलात 15 हजार शिपाई पदांची भरती; वयोमर्यादा ओलांडलेल्यांनाही संधी

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 12 August 2025, 18:09

मुंबई: राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलात सुमारे 15 हजार शिपाई पदांची भरती करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या भरती प्रक्रियेस मान्यता देण्यात आली.

वयोमर्यादा ओलांडलेल्यांसाठी एकवेळची संधी

विशेष बाब म्हणून, सन 2022 व 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. शासनाने यावर्षी एकवेळचा अपवाद म्हणून ही संधी उपलब्ध करून दिली आहे, ज्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळणार आहे.

पदांचे तपशील

राज्यातील पोलीस व कारागृह विभागातील रिक्त व रिक्त होऊ घातलेल्या पदांची माहिती पुढीलप्रमाणे:

पदाचे नाव                           पदसंख्या

 

१) पोलीस शिपाई                    10,908
२) बँड्स मॅन                          25
३) सशस्त्र पोलीस शिपाई         2,393
४) कारागृह शिपाई                 5,54

पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही गट-क संवर्गातील पदे असून त्यांची भरती जिल्हास्तरावरून करण्यात येणार आहे.

लेखी परीक्षा आता OMR प्रणालीद्वारे

उमेदवारांची निवड प्रक्रिया शारीरिक चाचणी व OMR (ऑप्टिकल मार्क रिडर) आधारित लेखी परीक्षेद्वारे पार पडणार आहे. अर्ज मागवणे, त्यांची छाननी, परीक्षा आयोजन इत्यादी जबाबदाऱ्या प्रशिक्षण व विशेष पथके विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक यांच्याकडे सोपवण्यात आल्या आहेत.

न्यायालयीन निर्देश व विधिमंडळातील मागणी

पोलीस दलातील रिक्त पदांमुळे सेवेतील कर्मचाऱ्यांवर ताण वाढतो ही स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी भरती प्रक्रिया वेळेत पार पाडण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींनी ही पदे तत्काळ भरावीत, अशी जोरदार मागणी केली होती.

ही भरती प्रक्रिया केवळ रिक्त जागा भरून काढण्यापुरती मर्यादित नसून, राज्याच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेला बळकटी देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल  मानले जात आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post

'पुण्याच्या टॉप कॉलेजमध्ये तुझं ऍडमिशन करून देईन' महाविद्यालयात प्रवेशाच्या बहाण्याने विद्यार्थ्याची फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp