पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असणार आहे. कारण, राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, हिंगोली येथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू, लॅब टेक्निशियन, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, पीअर सपोर्टर यांसह विविध पदांवर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला हिंगोली येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 90 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे.
जाणून घ्या संपूर्ण भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एमपीडब्ल्यू, लॅब टेक्निशियन, फिजिशियन, प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, डेटा एन्ट्री ऑपरेटर, पीअर सपोर्टर आणि अधिक विविध पदे.
– एकूण रिक्त पदे : 90 पदे.
– नोकरीचे ठिकाण : हिंगोली .
– वेतन / मानधन : दरमहा रु. 10,000/- ते रु. 1,25,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 12 ऑगस्ट 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 ऑगस्ट 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : NHM कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
https://hingoli.nic.in/ वरून माहिती घेता येणार आहे.