पुणे : राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 1.75 लाखापर्यंत पगार मिळू शकेल.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथे वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ञ, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य तज्ञ, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी यांसारख्या विविध पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : तांत्रिक अधिकारी (वित्त), संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, बहुउद्देशीय सहाय्यक, प्रशिक्षण व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी (आयटी) ), डेटा विश्लेषक, डेटा व्यवस्थापक आणि कम्युनिकेशन विशेषज्ञ.
– एकूण रिक्त पदे : 17 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, एमडी, डीएनबी, बी. एससी., डिप्लोमा, पीएच.डी., एम.एस्सी., पीजी डिग्री, बॅचलर डिग्री, एमबीए, बीबीए, एम. कॉम., सीए, बी.ई./बी. टेक., बीसीए, एम. टेक.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 25,000/- ते रु. 1,75,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता (हार्ड कॉपी) : आरोग्य विभाग, 5 वा मजला, नागपूर महानगरपालिका, सिव्हिल लाईन, नागपूर-440001.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.nmcnagpur.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.