MPSC News शिरूर : मावळातल्या डोंगर कपारीत आई वडींलासोबत शेळी चारण्यासाठी जायच. या काटेरी वाटेवर ऊन, वारा, पाऊस झेलत त्यांच्या जिवनातील दुख पहायच. कधी कधी हिंस्त्र प्राण्यांना सामोरे जायच. उपासमारीत मोलमजूरी करणाऱ्या बापान शिक्षणासाठी प्रोत्साहन द्याव. ठाकर समाजातील गरीबी परिस्थीतीला सामोरे जात ऊभा केलेला संसाराला काटेरी झुडपांमधून रानमेवा मिळावा. (MPSC News) अशीच परिस्थीती जुन्नर तालुक्यातील बाळोबाची वाडी येथील ठाकर समाजातील जोत्साना बबुशा भालेकर या मुलीची झाली आहे. (MPSC News) समाजातील अन्यायाविरूद्ध असणारी चिड व्यक्त करत तीने जिद्द व चिकाटीने अभ्यास करत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसनी घातल्याने तिच्या आई वडीलांच्या डोळ्यात आनंदाअश्रु तरळले होते. (MPSC News) त्यामुळे जुन्नर तालुक्यातील ठाकर समाजातील जोत्स्नाचे सर्वत्र कौतुक होत आहे. (MPSC News)
बाळोबाची वाडी येथील ठाकर समाजातील ‘जोत्स्ना’चे पहिल्या प्रयत्नात यश
जुन्नर तालुक्यातील बाळोबाची वाडी हे मावळ भागातील अगदी कमी लोकवस्ती असणारे गाव आहे. ठाकर समाजातील अधिवासी भागात शिक्षणासाठी काटेरी वाटेतून पायपिट करत जोत्स्ना ने गावातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेतले आहे. बाळोबाच्या वाडीत राहणाऱ्या ठाकर समाजातील बाबुशा भालेकर यांच्या घरी अठराविश्वे दारिद्र्य, दुसऱ्याच्या शेतावर राब, राब राबायचे. दररोज मोलमजुरी करायची अन् आपल्या चिमुकल्यांसह पोटाची खळगी भरायची, प्रत्येक दिवसाची अशी ही सुरुवात होती. डोंगर कपारीत बकऱ्यांच्या पाठीमागे धावत आई तारा तर वडील बबुशा यांच्या सोबतीने आयुष्याच्या काही काटेरी वाटा पाहिल्या आहेत. तिने पाचवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण श्री छत्रपती हायस्कूल येणरे या ठिकाणी शिक्षण घेतले आहे.
या काळात शिक्षणासाठी काही योजना जोत्स्ना पर्यंत पोहचल्या. त्यामुळे तिला शिक्षणासाठी पाठबळ मिळाले. दररोज काटेरी वाटेतून चार ते पाच किलोमिटर धावून तिने शिक्षण घेतले आहे. याकामी मुख्याध्यापक तान्हाजी लांडे यांनी सर्वोतोपरी मदत केली. अकरावी व बारावी पर्यंतचे शिक्षण तिने म्हाळसाकांत कॅालेज आकुर्डी येथे पुर्ण केले. हडपसर येथील आण्णासाहेब मगर कॅालेज मधून तिने कला पदवीतून शिक्षण घेतले आहे.
धावण्याच्या क्रिडा प्रकारातून तालुका, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर तिने उल्लेखनिय कामगीरी केली होती. या काळानंतर तिने 2018 मध्ये मुंबई लोहमार्ग पोलिस दलात भरती झाली. सरकारी नोकरी मिळाल्याने तीने ध्येय उंचावले होते. तिने या पदा पर्यंत जिद्द न ठेवता. तिला अधिकारी बनण्याचे स्वप्न पुर्ण करायचे होते. यशस्विता मिळण्यासाठी घरच्या घरी अभ्यास सुरूच ठेवला होता. त्यातून तीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या यावेगवेगळ्या परिक्षा दिल्या.
दरम्यान, सन 2020 मध्ये झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा परिक्षेचा निकाल जाहिर झाला. त्यात जोत्स्नाला पहिल्या प्रयत्नात यश मिळाले असून पोलिस उपनिरीक्षक पदासाठी तिची निवड झाली आहे. अखेर ठाकर समाजातील या मुलीने आपल्या आई वडीलांची मान अभिमानाने उंचावली आहे.
यशस्वितेचे गमक साधल्यावर जोत्स्ना म्हणाली की, काटेरी वाटेवरील जीवनाने माझ्या आयुष्याला कलाटणी दिली असून आई वडीलांचे सर्व स्वप्न पुर्ण करणार आहे. या पदातून जनतेची नेहमीच सेवा करून न्याय मिळवून देण्याचे काम करेन. नव्याने स्पर्धा परिक्षांना सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करताना आपल्या आई वडीलांच्या कष्टाला विसरू नका. जिद्द व चिकाटी ठेवून परीक्षेला सामोरे जा.