पुणे : नोकरीच्या शोधात असलेल्या इच्छुकांसाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण, महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात विविध पदांसाठी भरती केली जात आहे. या भरती प्रक्रियेत एकूण 602 पदे भरली जाणार असून, यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चांगला पगारही मिळणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल या पदासाठी भरती केली जात आहे. यात ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 असणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
कोणत्या पदांवर होणार भरती?
- आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम) या पदांसह वरील दिलेल्या पदांवर भरती केली जाणार आहे.
- एकूण रिक्त पदे : 602 पदे (नाशिक 182, ठाणे 145, अमरावती 83, नागपूर 192).
- किती मिळू शकतो पगार? – यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 19,000 ते 1,22,800 पर्यंत पगार मिळू शकणार आहे.
- वयोमर्यादा काय? : 18 ते 38 वर्षे.
- अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
- नोकरीचे ठिकाण : नाशिक, ठाणे, अमरावती, नागपूर.
- अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : 1000/-, मागासवर्गीय / आ.दु.घ 900/-
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 23 नोव्हेंबर 2023.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 डिसेंबर 2023
- परीक्षा (CBT) : जानेवारी/ फेब्रुवारी 2024
या भरती प्रक्रियेसंदर्भातील अधिक माहिती अधिकृत वेबसाईट https://tribal.maharashtra.gov.in/ वरून घेता येणार आहे.