पुणे : तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी असू शकते. कारण, भारतीय प्रादेशिक सेना या केंद्र शासनाच्या विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
भारतीय प्रादेशिक सेना येथे शिपाई (जनरल ड्युटी, लिपिक, व्यापारी) या पदांवर भरती केली जात आहे. त्यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. संबंधित उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे. त्यानंतर यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला संपूर्ण भारतात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 1901 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
8 नोव्हेंबर, 2024 पासून अर्ज प्रक्रिया सुरु होत आहे. तर 27 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी
www.jointerritorialarmy.gov.in या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव: शिपाई (जनरल ड्युटी, लिपिक, व्यापारी).
– एकूण रिक्त पदे : 1901 पदे.
– नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.
– शैक्षणिक पात्रता : आठवी, दहावी, बारावी उत्तीर्ण.
– वयोमर्यादा : 18-42 वर्षे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 08 नोव्हेंबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2024.