पुणे : आपल्यापैकी जर कोणी नोकरीच्या शोधात असेल तर ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर, नागपूर येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. त्यानुसार, आता रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची थेट मुलाखतीच्या माध्यमातून निवड केली जाणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
नागपूर येथील जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर येथे कार्यशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ / कनिष्ठ संशोधन फेलो या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नागपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत ३ रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 25000 ते 28000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.jnarddc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : कार्यशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ संशोधन फेलो, वरिष्ठ / कनिष्ठ संशोधन फेलो.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नागपूर.
– शैक्षणिक पात्रता : बी.ई. किंवा एम.ई., आय.टी.आय.
– वेतन / मानधन : दरमहा 25000 ते 28000 पर्यंत.
– वयोमर्यादा : 30 वर्षांपर्यंत.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 7 फेब्रुवारी 2025.
– मुलाखतीचा पत्ता : जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम संशोधन विकास आणि डिझाइन सेंटर समोर, वाडी पोलीस स्टेशन, अमरावती फ्लॉड, वाडी नागपूर – 440 023.