सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, सीबीएस मुंबई येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
सीबीएस मुंबई येथे ‘ज्युनियर रिसर्च फेलो’ या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव – ज्युनियर रिसर्च फेलो
– एकूण रिक्त पदे : 1 पद.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : एम. एस्सी.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 31,000/- ते रु. 37,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 फेब्रुवारी 2024.
– अर्ज पाठवण्याचा ई – मेल पत्ता : registrar@cbs.ac.in
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://www.cbs.ac.in/ वरून माहिती घेता येणार आहे.