पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, बृहन्मुंबई महानगरपालिका अर्थात BMC येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई येथे प्रोग्राम को-ऑर्डिनेटर, आहारतज्ञ, कार्यकरी सहाय्यक, डेटा एंट्री ऑपरेटर, एनसीडी कॉर्नर्स एमपीडब्ल्यू यांसारख्या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 115 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. सदर मुलाखत ही लवकरच घेतली जाणार आहे. मात्र, यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 मे 2025 असणार आहे.
या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा 17000 ते 40000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.