पुणे : नाशिकच्या के. के. वाघ कृषी महाविद्यालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळू शकणार आहे.
के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक, कृषी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि पशुधन पर्यवेक्षक या पदावर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यात वयोमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. पात्र उमेदवारालाच अर्ज करता येणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही चाचणी परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, कृषी सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक आणि पशुधन पर्यवेक्षक.
– नोकरीचे ठिकाण : नाशिक.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन / ऑनलाईन (ई-मेल).
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 08 ऑक्टोबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 ऑक्टोबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्राचार्य, के. के. वाघ कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी, सर्व्हे नंबर 240, सरस्वतीनगर, पंचवटी, नाशिक
– अर्ज पाठवण्याचा ई–मेल : careeropportunities.agri@kkwagh.edu.in
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://agri.kkwagh.edu.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.