पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला सोलापूर येथे सुरु असलेल्या भरती प्रक्रियेबाबत माहिती देणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, 230 रिक्त पदांवर भरती केली जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, सोलापूर येथे विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य, दंतवैद्य, वैद्यकीय अधिकारी (आयुष), वैद्यकीय अधिकारी (आरबीएसके), ऑडिओलॉजिस्ट, श्रवणक्षम प्रशिक्षक, मानसोपचार परिचारिका, आर्थिक संकल्प आणि वित्त अधिकारी, फिजिओथेरपिस्ट, कार्यक्रम समन्वयक या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे.
यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला सोलापूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 230 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 15,500 ते 1,25,000 पर्यंत पगार मिळू शकणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://zpsolapur.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.