पुणे : नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, BMC च्या भाभा रुग्णालय, कुर्ला येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. या रुग्णालयात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
भाभा रुग्णालय, कुर्ला येथे समुदाय विकास अधिकारी, कार्यकारी सहाय्यक (लिपिक), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, कनिष्ठ ग्रंथपाल, कनिष्ठ आहारतज्ज्ञ या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला कुर्ला, मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 8 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी खान बहादुर भाभा रुग्णालय कुर्ला (प) येथील आवक जावक विभाग, पहिला मजला येथे अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 एप्रिल 2025 असणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 20000 ते 30000 रुपयांपर्यंत पगारही मिळणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in/ अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.