नवी दिल्ली : बँकेत नोकरी मिळावी, असे अनेकांना वाटत असते. पण अशा उमेदवारांची ही इच्छा आता पूर्ण होणार आहे. कारण कर्नाटक बँकेत प्रोबेशनरी अधिकारी अर्थात पीओ पदासाठी भरती केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट असणार आहे. बँकेत पीओ पदासाठी भरती लेखी चाचणी आणि मुलाखतीनंतर केली जाईल.
शैक्षणिक पात्रता काय?
कर्नाटक बँकेत पीओ पदाच्या भरतीसाठी, उमेदवारांनी कोणत्याही शाखेतील पीजी किंवा एक वर्षाचे कार्यकारी एमबीए पूर्ण केलेले असावे. कृषी विज्ञान पदवी, कायद्यातील पदवी आणि विपणन/वित्त क्षेत्रातील एमबीए असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा काय?
कर्नाटक बँकेत पीओ भरतीसाठी उमेदवारांचे वय कमाल 18 वर्षे असावे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट मिळेल.
कशी असेल भरती प्रक्रिया?
कर्नाटक बँकेत पीओ पदाच्या भरतीसाठी प्रथम लेखी परीक्षा होईल. लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखत होईल. अंतिम निवड लेखी चाचणी आणि मुलाखतीतील निकालावर आधारित असेल. दोन्ही परीक्षांमध्ये सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची पीओ पदासाठी निवड केली जाईल.
अर्ज शुल्क किती?
पीओ पदाच्या भरतीसाठी अर्ज शुल्क 800 रुपये असणार आहे. तर एससी आणि एसटी प्रवर्गासाठी अर्जाची फी 700 रुपये आहे.
अधिक माहितीसाठी कर्नाटक बँकेच्या https://karnatakabank.com/ वेबसाइटला भेट देऊन अर्ज करता येऊ शकतो.