गणेश सुळ
Job News : केडगाव : पुरंदर तालुक्यातील 30 गावांसह दौंड तालुक्यातील रिक्त असलेल्या गावातील पोलिस पाटील पदाची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. दौंड तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलिस पाटलाच्या पदांची भरती प्रक्रिया सुरूही करण्यात आली आहे.(Job News)
पोलिस पाटलाच्या पदांची भरती प्रक्रिया सुरूही करण्यात आली आहे.
पोलिस पाटील संगवर्गासाठी आरक्षणनिहाय गावाची निश्चिती व आरक्षणाची प्रक्रिया आज झाली. पुरंदरचे तहसिलदार यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता दौंड-पुरंदरचे उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी ही प्रक्रिया पार पाडली.(Job News) यामध्ये दौंड तालुक्यातील नाथाचीवडी-अनुसूचित जाती महिला, खुटबावं-अनुसूचित जाती महिला, टेळेवडी-अनुसूचित जाती, देऊळगाव गाडा-अनुसूचित जाती, मिरवडी-अनुसूचित जमाती, बिरोबावडी-अनुसूचित जमाती, भरतगव-विषेश मागास प्रवर्ग, वडगांव बांडे – भटक्या ज.(ब), ताम्हांनवडी – इतर मागास प्रवर्ग, वासुंडदे – इतर मागास प्रवर्ग, लडकत वाडी खुल्या गटासाठी आरक्षित करण्यात आले. याबाबतची माहिती दौंडचे तहसिलदार अरुण शेलार यांनी दिली.
दरम्यान, या आरक्षण सोडतबाबतची माहिती प्रत्येक गावात देण्याबाबतचे आदेश गावकामगार, तलाठी यांना देण्यात आले होते. त्यात आता दौंड तालुक्यातील गावांना पोलिस पाटील मिळणार आहेत. त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील असे म्हटले जात आहे.(Job News)