पुणे : साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेत मेगा भरती निघाली आहे. जर तुमच्याकडेही आवश्यक पात्रता असेल तर तुम्हाला याठिकाणी नोकरीची संधी मिळू शकणार आहे. या संस्थेत विविध रिक्त पदांवर भरती केली जात आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही प्रत्यक्ष मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी पुण्यासह काही ठिकाणी मुलाखत घेतली जाणार आहे.
जर तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. रयत शिक्षण संस्था, सातारा येथे सहाय्यक प्राध्यापक यांसह इतर अनेक पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्रात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 494 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक.
– एकूण रिक्त पदे : 494 पदे.
– नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात कुठंही.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– ऑनलाईन अर्ज शुल्क : 200 रुपये.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 मे 2025.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 14 मे 2025.
– मुलाखतीचा पत्ता :
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंधगाव, पुणे
2) महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी, पुणे
3) एस. एम. जोशी महाविद्यालय, हडपसर, पुणे
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://rayatshikshan.edu/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.