Job News : पुणे : सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी असणार आहे. कारण राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथे नवीन 60 पेक्षा अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यूसह इतर काही पदांवर भरती केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला जळगाव येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे.
या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी अधिकृत वेबसाईटवरून तुम्हाला अधिक माहिती घेता येऊ शकणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत विविध पदांवर भरती केली जाणार आहे. पण अनुभवी उमेदवारांना यामध्ये प्राधान्य दिले जाणार आहे.
– पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, एमपीडब्ल्यू, स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (पुरुष), समवयस्क शिक्षक, योग प्रशिक्षक.
– रिक्त पदे : 60+ पदे.
– नोकरीचे ठिकाण : जळगाव.
– अर्ज करण्याचं माध्यम : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2023.
– कुठं मिळेल अधिक माहिती?
या पदांबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाईट https://jalgaon.gov.in/ वर जाऊन घेता येणार आहे.
– अर्ज शुल्क किती?
खुला प्रवर्ग – रु. 150/-, राखीव प्रवर्ग – रु. 100/-.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता?
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांच्या नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डिंग), जिल्हा परिषद, जळगांव