Job News नवी दिल्ली : सरकारी नोकरी मिळावी यासाठी अनेकांचे प्रयत्न असतात. काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण आता ही प्रतीक्षा संपणार आहे, कारण केंद्रीय लोकसेवा आयोगात (UPSC) नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. UPSC ने स्पेशालिस्ट ग्रेड III आणि इतर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवारांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 30 पदे भरण्यात येणार आहेत. तुम्हालाही या पदांसाठी अर्ज करायचा असल्यास खाली नमूद केलेली पात्रता निवड प्रक्रिया आणि इतर तपशील काळजीपूर्वक वाचा.
पदांचा तपशील –
– पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजिस्ट : 1 पद
– वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक : 5 पदे
– उप केंद्रीय गुप्तचर अधिकारी : 4 पदे
– कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी : 1 पद
स्पेशलिस्ट ग्रेड III: 19 पदे
भरतीसाठी पात्रता निकष काय?
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार खाली दिलेल्या तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात.
अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?
या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2023 पर्यंत असणार आहे.
अर्ज शुल्क किती?
उमेदवारांना 25 रूपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. SBI च्या कोणत्याही शाखेत किंवा कोणत्याही बँकेच्या नेट बँकिंग सुविधेचा वापर करून किंवा Visa/Master/Rupay/क्रेडिट/डेबिट कार्ड/UPI वापरून अर्जाची भरावी लागेल.
– SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.
यासंबंधी अधिक माहितीसाठी, उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in/ ला भेट देऊन माहिती घेऊ शकतात.