Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli Kanchan Big News : अनधिकृत गौणखनिज उत्खनन प्रकरणी “उरुळी कांचन ग्रामपंचायती” ला तब्बल पंधरा कोटींचा दंड? जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (क्ष) नुसार, अनधिकृत गौणखनिज उत्खननात बाजारभावाच्या पाचपट दंडाची तरतुद

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Sunday, 13 August 2023, 18:31

उरुळी कांचन, ता.१३ : उरुळी कांचन पाणीपुरवठा योजनेच्या साठवणूक तलावासाठी (स्टोअरेज टँक) आठ महिन्यांपासून पाच एकर जागेत चालू असलेल्या खोदकामातून निघालेला ५० हजारांहून अधिक ब्रास मुरुम रितसर ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिल्याचा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता महादेव देवकर यांनी केला आहे. उपअभियंता महादेव देवकर यांच्या दाव्यामुळे मुरूमाची परस्पर विल्हेवाट लावण्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारीच नव्हे तर ग्रामपंचायतीचे काही आजी-माजी पदाधिकारीच असल्याची उरुळी कांचनच्या नागरिकांची शंका खरी ठरली आहे.

मुरुमाची विल्हेवाट लावण्यात ग्रामपंचायतीचे काही आजी-माजी पदाधिकारी सहभागी असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली; तरी दुसरीकडे उरुळी कांचनचे आजपर्यंतचे ‘सर्वपक्षीय-सर्वदलीय’ राजकारण पहाता, मुरुम विक्रीतुन मालामाल झालेल्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची सखोल चौकशी होणार का, त्या ‘चोरांची’ नावे नागरिकांना समजणार का व संबंधित चोरांवर शासनाकडून कायदेशीर कारवाई होणार की नाही, याकडे उरुळी कांचन ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. दरम्यान मुरुमाची बेकायदा विक्री (गौण खनिजाची विल्हेवाट लावल्यास) केल्यास गौणखनिज उत्खननात बाजारभावाच्या पाचपट दंडाची तरतुद असल्याने, या प्रकरणात पंधराहुन अधिक कोटीचा दंड होण्याची शक्यता महसुल विभागातील वरीष्य़ांनी व्यक्त केली आहे.

आयजीच्या जीवावर बायजी उदार…
उरुळी कांचन ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटेल, या आशेने उरुळी कांचन येथील श्री राम देवस्थान ट्रस्टने मोठ्या मनाने त्यांच्या मालकीची सीताई इनाम जमिनीची ७ एकर जागा ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर पाणी पुरवठा योजनेसाठी देऊ केली आहे. या जागेचा करार होण्यापूर्वीच ग्रामपंचायतीने सात एकरपैकी पाच एकर जागेत स्टोअरेज टँकसाठी मागील ८ महिन्यांपासून खोदकाम चालू केले आहे.

या खोदकामातून निघालेल्या ५० हजारांहून अधिक ब्रास मुरुमाची साठवणूक करणे अपेक्षित असताना, ग्रामपंचायतीच्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी मुरुमाची परस्पर विल्हेवाट लावल्याची बाब पुढे आली आहे. खोदकाम झालेल्या जागेची मालकी श्री राम देवस्थान ट्रस्टची असल्याने, त्या जागेतून निघालेल्या मुरुमावरही मालकी संबंधित ट्रस्टची असायला हवी होती. मात्र, आयजीच्या जीवावर बायजी उदार… या म्हणीप्रमाणे ग्रामपंचायतीच्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनीच मुरुमाची विल्हेवाट लावल्याचे स्पष्ट होत आहे.

 

पंधरा कोटी रुपये दंडाची शक्यता…
दरम्यान, अनधिकृत गौणखनिज (मुरुम) उत्खननाबरोबरच, मुरुमाची बेकायदा विक्री (गौण खनिजाची विल्हेवाट लावल्यास), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (क्ष) व त्या खालील नियम महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार व दिनांक १२ जानेवारी २०१८ नुसार, एखाद्याने अनधिकृत गौणखनिज (मुरुम) उत्खननाबरोबर मुरुमाची बेकायदा विक्री केल्यास विक्री झालेल्या मुरुमाच्या शासकीय किंमतीच्या पाच पट दंडाची आकारणी महसूल विभागाकडून केली जाते.

सध्या मुरुमाची शासकीय किंमत सरासरी सहाशे रुपये धरल्यास, त्याच्या पाचपट म्हणजेच एका ब्रासला तीन हजार रुपये दंड होण्याची शक्यता आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी ५० हजारांहून अधिक ब्रास मुरुमाची विल्हेवाट लावल्याची चर्चा आहे. यामुळे या प्रकरणात ५० हजार ब्रास मुरुम गेल्याचे निष्पन्न झाल्यास, सुमारे १५ कोटी रुपयांचा दंड आकारला जाण्याची शक्यता महसूल विभागातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

दंडाची रक्कम पदाधिकाऱ्यांकडूनच वसूल करावी…
याबाबत प्रतिक्रिया देताना श्री राम देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुनिल कांचन म्हणाले की, अनधिकृत गौणखनिज (मुरुम) उत्खननाबरोबरच मुरुमाची बेकायदा विक्री (गौण खनिजाची विल्हेवाट लावल्यास), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (क्ष) व त्याखालील नियम महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार व दिनांक १२ जानेवारी २०१८ नुसार, उरुळी कांचन ग्रामपंचायतीला ५० हजार ब्रास मुरुमाच्या विल्हेवाटीबद्दल मोठा दंड होण्याची शक्यता आहे.

सर्वसामान्य शेतकऱ्यांनी आपल्या जागेतील मुरुमाची बेकायदा विल्हेवाट लावल्यास प्रती ब्रास तीन हजार रुपये दंड आकारला जातो. हाच नियम याही प्रकरणात लावण्याची गरज आहे. असे झाल्यास ग्रामपंचायतीला १५ कोटी रुपयांचा दंड होण्याची शक्यता आहे. हा दंड ग्रामपंचायतीकडून नव्हे तर मुरुमाची विल्हेवाट लावणाऱ्याकडून वसुल करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दंडाची रक्कम ही ग्रामपंचायतीकडून नव्हे तर पदाधिकाऱ्यांकडूनच वसुल करावी अशी मागणी करणार असल्याचेही सुनिल कांचन यांनी स्पष्ट केले.

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात संजय राऊतांचा गंभीर आरोप; ‘हत्येचे सूत्रधार शिंदे गटात…..

Wednesday, 30 September 2026, 11:14

अंगावर चिखलाचं पाणी उडालं अन् पोलिसाचा पारा चढला! पुण्यात 17 वर्षीय मुलाचा पाठलाग, भररस्त्यात मारहाण; महिनाभराने कायदेशीर प्रक्रिया

Wednesday, 30 September 2026, 10:57

पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झालं हत्याकांडाचं गूढ! केतन अग्रवाल हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा समोर; कॅमेऱ्यात नेमकं काय दिसलं?

Wednesday, 30 September 2026, 10:51

सोन्याच्या दराला पुन्हा ब्रेक! 30 सप्टेंबरला सोने-चांदी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

Wednesday, 30 September 2026, 10:35

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळ्यात मोठी कारवाई! जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक; प्रकरणाला नवं वळण

Wednesday, 30 September 2026, 10:27

WhatsApp वर प्रत्येक मेसेजसाठी मोजावे लागणार 14 पैसे! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम, पाहा कोणाला द्यावे लागणार पैसे

Wednesday, 30 September 2026, 10:23
Next Post
vacancy in pune air force school pune

Job News : UPSC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! फक्त 25 रुपये अर्ज शुल्क भरा अन् अधिकारी व्हा; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp