नवी दिल्ली : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण दिल्लीतील डॉ. बी. आर. आंबेडकर विद्यापीठाने भरती अधिसूचना जारी केली आहे. ज्यासाठी उमेदवार अधिकृत साईट aud.ac.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती अंतर्गत उमेदवार 8 सप्टेंबरपर्यंत अर्ज करू शकतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात शिक्षकेतर पदांसाठी भरती केली जात आहे. या मोहिमेअंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (सामान्य, सचिवीय सेवा आणि आयटी), सहाय्यक (सामान्य), सहाय्यक सह काळजीवाहक, डॉक्युमेंटेशन असिस्टेंट, सहाय्यक (सचिवीय सेवा), स्टुडिओ असिस्टंट, क्रीडा प्रशिक्षक, स्टाफ नर्स, सुरक्षा अधिकारी, विभाग अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी अशा विविध पदावर भरती केली जाणार आहे.
काय असावी पात्रता?
या भरती प्रक्रियेत वरिष्ठ सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्थेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय, स्टुडिओ असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि व्हिज्युअल आर्ट, सुतारकाम, इलेक्ट्रिकल वर्क, परफॉर्मन्स आर्टमध्ये 2 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.