पुणे : चांगली नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण, महिला व बाल विकास विभागात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना येथे मुख्यसेविका / पर्यवेक्षिका गट-क या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला महाराष्ट्रात कुठंही जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत 272 रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2025 ही असणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही परीक्षा, मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला 35400 ते 112400 पगार मिळणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : मुख्यसेविका / पर्यवेक्षिका गट-क.
– एकूण रिक्त पदे : 272 पदे
– नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र.
– शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवीधर.
– वेतन / मानधन : 35400 ते 112400 रुपये
– वयोमर्यादा :
खुल्या प्रवर्गासाठी : किमान 21 वर्षापेक्षा कमी नसावे व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे, मागासवर्गीय उमेदवारांसाठी : किमान 21 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 30 एप्रिल 2025
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2025.
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://www.maharashtra.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.