पुणे : तुम्ही चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत आनंदाची बातमी असणार आहे. कारण, मुंबईतील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन’ येथे नोकरीची संधी मिळू शकणार आहे. यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता अर्ज करता येणार आहे. पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी 13 मे 2025 रोजी मुलाखत घेतली जाणार आहे.
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई येथे फील्ड असिस्टंट या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला मुंबई येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एक रिक्त पद भरले जाणार आहे. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत तुम्हाला अर्ज करता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : फील्ड असिस्टंट.
– एकूण रिक्त पदे : 01 पदे.
– नोकरीचे ठिकाण : मुंबई.
– शैक्षणिक पात्रता : जीवशास्त्रातील पदवी.
– वेतन / मानधन : दरमहा 25000 रुपये
– वयोमर्यादा : 21-45 वर्षे.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 13 मे 2025.
– मुलाखतीचा पत्ता : ICAR-सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन, मुंबई.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://www.cife.edu.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.