सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, नाशिक येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था नाशिक येथे सहाय्यक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला नाशिक येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 6 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. यासाठी ऑफलाईन माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक.
– रिक्त पदे : 06 पदे.
– नोकरीचे ठिकाण : नाशिक.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 9,300/- ते रु. 39,100/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 4 मार्च 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : अर्ज संचालक, विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्था, विभागीय आयुक्त कार्यालय आवार, नाशिकरोड, नाशिक.
– या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट http://www.ratinashik.in/ वरून माहिती घेता येणार आहे.