Job News नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेत नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय वायुसेनेने अग्निवीर वायूच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. Job News) या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे सर्व उमेदवार agnipathvayu.cdac.in या अधिकृत वेबसाईटवरून अग्निवीरवायू भरतीची अधिसूचना पाहू शकतात. (Job News)
अग्निवीरवायू भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया 27 जुलैपासून सुरू होणार आहे. इच्छुक उमेदवार 17 ऑगस्टपर्यंत भारतीय हवाई दलात भरतीसाठी अर्ज भरू शकतील.
कोण करू शकतं अर्ज?
अविवाहित भारतीय पुरुष आणि महिला उमेदवार भारतीय वायुसेना अग्निवीरवायूसाठी अर्ज करू शकतात. मान्यताप्राप्त मंडळातून बारावी उत्तीर्ण तरुण यासाठी अर्ज करू शकतात. यासाठी कमाल वयोमर्यादा 21 वर्षे असावी.
परीक्षा कधी?
अग्निवीरवायूच्या भरतीसाठी 13 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे. भारतीय हवाई दल अग्निवीरवायू निवड प्रक्रियेत तीन टप्पे असतील. पहिल्या टप्प्यात उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेला बसावे लागेल. तर दुसऱ्या टप्प्यात ऑनलाईन परीक्षेत शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि अनुकूलता चाचणी 1 आणि 2 आणि तिसऱ्या टप्प्यात उमेदवारांना वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल.
यादी कधी होणार प्रसिद्ध?
अग्निवीरवायूमध्ये नावनोंदणीसाठी मागविण्यात आलेल्या उमेदवारांची यादी फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध केली जाणार आहे.
परीक्षा शुल्क किती?
उमेदवारांना 250 रुपये शुल्क भरावे लागेल. डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकिंग वापरून पेमेंट गेटवेद्वारे पेमेंट केले जाऊ शकते.