Employment News : मुंबई : सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. कारण भारतीय नौदलात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. ‘नेव्हल शिप रिपेअर यार्ड’च्या माध्यमातून शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
शिकाऊ पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी
भारतीय नौदलाच्या ‘नेव्हल शिप रिपेअर यार्ड’च्याद्वारे ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत वेबसाईट indiannavy.nic.in ला भेट द्यावी लागणार आहे. याशिवाय, उमेदवार हा दहावी पास असणे गरजेचे आहेच. (Employment News) त्यासोबत ITI सुद्धा केलेले असावे. संबंधित ट्रेडचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
पदाचे नाव – शिकाऊ (ट्रेनी)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 नोव्हेंबर, 2023
वयोमर्यादा काय असावी?
या रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 14 वर्षे ते 21 वर्षे दरम्यान असावे. तसेच, उमेदवारांना कमाल वयात सूट दिली जाईल.
कशी होईल उमेदवाराची निवड?
या रिक्त पदासाठी उमेदवारांची निवड गुणवत्ता आणि लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. याशिवाय चांगल्या कामगिरीच्या आधारे उमेदवारांना गुणही दिले जातील. (Employment News) अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट indiannavy.nic.in वर जाऊन तपासू शकतात.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Employment News : UPSC मध्ये निघाली मोठी भरती; अनेक पदे भरली जाणार, आजच करा अर्ज…
Indapur News : मराठा आंदोलकांवरील लाठीमार दुर्देवी : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील