पुणे : तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला एका चांगल्या नोकरीची माहिती देणार आहोत. कारण, चंद्रपूरच्या राष्ट्रीय आरोग्य अभियान येथे रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी चारच दिवस शिल्लक राहिले आहेत.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, चंद्रपूर येथे सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, एमपीडब्ल्यू -पुरुष आणि कर्मचारी परिचारिका या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यासाठी मुलाखत घेतली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला चंद्रपूर येथे जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 30 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. जिल्हा एनएचएम कार्यालय, जिल्हा क्षयरोग रूग्णालय परिसर, रामनगर, चंद्रपूर येथे सदर अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://zpchandrapur.co.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, एमपीडब्ल्यू -पुरुष आणि कर्मचारी परिचारिका.
– एकूण रिक्त पदे : 30 पदे.
– नोकरीचे ठिकाण : चंद्रपूर.
– शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण, कोणताही वैद्यकीय पदवीधर, जी.एन.एम. / बी. एससी.
– वेतन/ मानधन : दरमहा रु. 18,000/- ते रु. 35,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 15 ऑक्टोबर 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 ऑक्टोबर 2024.