पुणे : तुम्ही देखील नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. कारण, ECHS पॉलीक्लिनिक देवलाली, नाशिक येथे नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार, आता पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. कारण, या ठिकाणी काही रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
ECHS पॉलीक्लिनिक देवलाली, नाशिक येथे प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी या पदांवर भरती केली जात आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पगारही चांगला मिळणार आहे. पण यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2024 ही असणार आहे.
यामध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. या प्रकियेंतर्गत 3 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी https://echs.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : प्रभारी अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी.
– एकूण रिक्त पदे : 03 पदे.
– नोकरीचे ठिकाण : देवलाली, नाशिक.
– शैक्षणिक पात्रता : पदवीधर, बीडीएस, एमबीबीएस.
– वेतन / मानधन : दरमहा रु. 75,000/- पर्यंत.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 नोव्हेंबर 2024.
– अर्ज पाठवण्याचा पत्ता : ECHS सेल, Stn HQ, देवलाली.
– निवड प्रक्रिया : मुलाखत.
– मुलाखतीची तारीख : 03 डिसेंबर 2024.