Today’s Horoscope: ‘या’ राशींचे दुखाचे दिवस आता गेले, इथून पुढे उजळणार भाग्य, येथे पाहा 12 राशींचे राशीफळ 18 एप्रिल रोजीचे राशीफळ पाहूया आजचा दिवस अनेक राशींसाठी उत्तम ठरणार आहे. तुमचा दिवस आज कसा जाणार आहे. यावर आम्ही आजचे राशीफळ घेऊन आलो आहोत. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.
येथे पाहा, 12 राशींचे आजचे राशीफळ:
मेष
आज तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे. तुमच्या मुलाला परीक्षेत यश मिळेल. भावा-बहिणींमधील सुरू असलेला दुरावाही दूर होईल.
वृषभ
आजचा दिवस तुमच्यासाठी बुद्धिमत्ता आणि विवेकबुद्धीने निर्णय घेण्याचा असेल. दूर राहणाऱ्या नातेवाईकाकडून तुम्हाला काही निराशाजनक बातमी मिळेल.
मिथुन
तुम्हाला खूप विचारपूर्वक बोलावे लागेल, तुम्ही तुमच्या कलात्मक कौशल्याने लोकांना चकित कराल, परंतु तुम्हाला तुमच्या कामाच्या बाबतीत सतर्क राहावं लागेल.
कर्क
मालमत्तेवरून वाद होण्याची शक्यता आहे. सासरच्या लोकांशी बोलताना काळजी घ्या अन्यथा वाद होऊ शकता.
सिंह
आईच्या तब्येतीच्या समस्येमुळे थोडी काळजी वाटेल. जबाबदारी समजून घेऊन काम कराव लागेल, काम कराची सवय लावा.
कन्या
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. पैशांशी संबंधित कोणतेही काम अडकले असेल तर ते पूर्ण होण्याची शक्यता आहे.
तुला
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. तुमच्या काही अनोख्या प्रयत्नांना यश येईल.
वृश्चिक
तुमच्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्हाला भरपूर आनंद मिळेल. आज लाभाचा दिवस आहे. केलेल्या कामाचे फळ आज मिळणार आहे.
धनु
कामाच्या बाबतीत वडिलांचा सल्ला घेणे हिताचे राहील. तुमच्या घरात काही धार्मिक समारंभ आयोजित झाल्यास तुम्ही आनंदी व्हाल.
मकर
दुसऱ्यावर अवलंबून रहाल तर कामात विलंब होऊ शकतो. आनंदी दिवस आहे परंतु सासरच्या व्यक्तीशी वाद होण्याची शक्यता आहे.
कुंभ
व्यवसायात चांगले यश मिळेल, अनेक प्रश्न मार्गी लागतील, कुटुंबात एखादे धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे.
मीन
कुटुंबातील लोक तुमच्या बोलण्याला पूर्ण महत्त्व देतील, तुम्हाला तुमच्या आरोग्याकडेही पूर्ण लक्ष द्यावे लागेल.सहलीला जाण्याची योजना आखू शकता.