मेष: आज तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. कामाचा उरक राहील. दैनंदिन कामे सहजपणे पूर्ण होतील. आज तुम्ही विशेष उत्साही राहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम राहील.
वृषभ : कामाचा ताण जाणवणार आहे. आज तुमचे मन एखाद्या बाबतीत साशंक राहील. अनावश्यक कामात वेळ वाया जात असल्याने आपली चिडचिड होणार आहे. आज शक्यतो प्रवास करण्याचे टाळावे.
मिथुन : आज आपणाला विविध लाभहोणार आहेत. तुमचे मानसिक व वैचारिक परिवर्तन होणार आहे. आज तुम्ही कामामध्ये व्यस्त राहणार आहात. काहींना अनपेक्षितपणे धनलाभ होणार आहेत.
कर्क : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आज आपण आनंदी व आशावादी राहणार आहात. आपल्यावर असणारी जबाबदारी आज आपण योग्य रीतीने पार पाडणार आहात. आपल्याला अनेक बाबतीत अनुकूलता राहील.
सिंह: आज आपल्याला अनपेक्षितपणे प्रवास करावा लागेल. आपले मनोबल व आत्मविश्वाश्च उत्तम राहील. आपल्यावर कामाचा ताण राहणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभेल. उत्साही व आनंदी राहणार आहात.
कन्या : काहींना अनपेक्षित धनलाभ होणार आहे. आपल्याला कौटुंबिक जीवनाचा आनंद मिळेल. आर्थिक कामे योग्य रीतीने पार पडणार आहेत. कुटुंबातील व्यक्तींसाठी वेळ देऊ शकणार आहात. आनंदी राहाल.
तुळः आपले मनोबल वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. आपल्याला मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार आहे. आपण आज इतरांना मदत करणार आहात.
वृश्चिक: आपले कोणीच नाही, ही भावना आज आपल्याला त्रस्त करेल. आज आपण कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नये. काहींना नैराश्य जाणवेल, तर काहीजण धार्मिक कार्यात रममाण होणार आहेत.
धनु: मुला-मुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देणार आहात. आनंदी व आशावादी राहणार आहात. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. काहींना अनपेक्षितपणे आर्थिक लाभ होणार आहेत. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मकर: तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आज तुम्ही आपली मते परखडपणाने मांडणार आहात. आपल्या विचारावर ठाम राहाल. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत.
कुंभ : काहींना अनपेक्षितपणे प्रवास करावा लागणार आहे. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आपल्यावर कामाचा ताण राहील, मात्र आपण कामे पूर्ण करणार आहात. जिद्दीने कार्यरत राहाल.
मीन: आज आपल्याला मानसिक अस्वस्थता सतावणार आहे. कामामध्ये लक्ष लागणार नाही. आपल्यावर अनावश्यक ताण राहणार आहे. मनाविरुद्ध एखादी घटना घडल्याने तुमचे मन नाराज राहील.