१२ फेब्रुवारीला शुक्राचा प्रवेश मकर राशीत होणार आहे. बुध व शुक्र हे दोन्ही धन-वैभवाचे कारक मानले जातात. बुध हा बुद्धीचा तर शुक्र हा प्रेमाचा ग्रह म्हणून सुद्धा ओळखला जातो. या दोन्ही ग्रहांच्या युतीने आता काही राशींच्या आयुष्यात प्रेम व धनाची वर्षा होणार आहे. गडगंज श्रीमंतीचा हा योग माघी गणेश जयंतीच्या एक दिवस आधी तयार होत असल्याने गणपती बाप्पा या राशींना मोदकासारखी गोड बातमी देणार आहेत असंच म्हणता येईल. या प्रभावित राशी कोणत्या, चला पाहूया.
हा राजयोग आपल्या राशीच्या कर्म भावी तयार होणार आहे. त्यामुळे आपल्या कर्माचे फळ या काळात मिळू शकते. कामाच्या ठिकाणी आपली प्रगती होण्याची चिन्हे दिसत आहेत. विवाहोत्सुक वर-वधूंना मनाजोगता जोडीदार मिळण्यास ग्रहांचे पाठबळ मिळेल. विवाहित दाम्पत्यांना एकमेकांसाठी वेळ राखून ठेवावा लागेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढ होण्याची शक्यता आहे.
मेष रास
मेष राशीच्या लोकांना आपल्या कर्माचे फळ या काळात मिळू शकते. कामाच्या ठिकाणी प्रगती होण्याची चिन्हे आहेत. विवाहोत्सुक वर वधूंना मनाजोगता जोडीदार मिळण्यास ग्रहांचे पाठबळ आहे. विवाहित दाम्पत्यांना एकमेकांसाठी वेळ राखून ठेवावा लागेल. वडिलांसह नात्यात सुधारणा होईल.
वृषभ रास
वृषभ राशीसाठी अनुकूल वातावरण आहे. लक्ष्मी नारायण राजयोग हा चांगला लाभ घेऊन येऊ शकतो. प्रवासाची संधी मिळू शकते. धार्मिक कार्यातील आपली आवड वाढू लागेल. वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो. गुंतवणूकीतून लाभ होईल. घर, जमीन यासंबंधीची कामे हळूहळू मार्गी लागतील. विद्यार्थ्यांना बुधाचे साहाय्य कामी येईल. आपले मुद्दे ठामपणे मांडाल, निर्धार सोडू नका. विवाहोत्सुक मुलामुलींनी थोडे सबुरीने घ्यावे.
मकर रास
२०२३ पेक्षा २०२४ हे वर्ष एकूणच तुमच्यासाठी चांगले असेल त्यात या राजयोगाची जोडी लाभल्याने प्रचंड धनलाभ संभवतो. या वर्षी तुम्हाला नोकरी-व्यवसायात लाभ होईल. आर्थिक लाभ होईल. भौतिक सुखाची सुरवात होईल. मकर राशीच्या प्रथमच भावी लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. व्यवसाय चांगला चालेल. आपला आत्मविश्वास वाढल्याने अनेक कठीण वाटणाऱ्या गोष्टी पूर्णत्वास नेऊ शकता. नोकरीसाठी सुरु असलेली धडपड शुभ परिणामांसह थांबेल