तुम्ही वारंवार आजारी पडताय, संकटात अडकताय किंवा तुम्हाला नेहमी थकवा जाणवतोय? तर तुमच्या घरात वास्तूदोष असू शकतो. वास्तूशी संबंधित काही चुकांमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. घरात अशा काही वस्तू असतात, ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. उदाहरण सांगायचं झालं तर, तुमच्या घरात इतरत्र कचरा पडला असेल किंवा तुमचा बेड विस्कटलेला असेल, घर नेहमी अस्वच्छ असेल तर, यामुळे तुम्हाला घरात विचित्र वाटेल किंवा कामात लक्ष राहणार नाही, चिडचिड होईल.
वास्तुशास्त्र देखील त्याचप्रमाणे आहे. जर तुम्ही वास्तूचे नियम पाळले नाही तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात येऊ शकते, ज्याचा तुमच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. तर, चांगल्या आरोग्यासाठी वास्तूच्या कोणत्या चुका टाळाव्यात? जाणून घेऊया.
खिडक्या-दरवाजे सतत बंद ठेवू नका
बाहेरची मोकळी हवा सगळ्यांनाच आवडते. त्याचप्रमाणे घरातही खेळती हवा राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे वेंटिलेशनसाठी खिडक्या-दरवाजे उघडे ठेवावे. नेहमी दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवू नये, यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येते. जर तुम्ही सकाळ-संध्याकाळ खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवत असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो.
घरात झाडं नसणं
आजकालच्या घरांमध्ये जागा खूपच कमी असते,. त्यामुळे घरांमध्ये झाडं लावणं खूप अवघड आहे. परंतु चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही घरात झाडं ठेवू शकता. घरामध्ये हिरवीगार झाडी असल्याने तुमचं आरोग्य चांगलं राहतं. अशी काही झाडं आहेत, जी तुम्ही सहजपणे घरात ठेवू शकता. यात एअर प्युरिफायर प्लांट्स नक्की ठेवा.
पलंग दक्षिण दिशेला ठेवू नये
दक्षिण दिशा ही यमराजाची मानली जाते, त्यामुळे दक्षिण दिशेला पाय करुन झोपणं टाळावं. वास्तूनुसार, दक्षिणेकडे पाय करून झोपल्याने डोकं आणि पाय दुखू शकतात. याशिवाय शरीराच्या इतर भागांमध्येही वेदना होत असल्याची तक्रार तुम्हाला जाणवेल. अंगदुखीचा त्रास सतत जाणवू शकतो.
नैसर्गिक सूर्यप्रकाशाला जागा न देणं
कधी-कधी घरात नैसर्गिक सूर्यप्रकाश येण्यासाठी जागा नसल्याने लाईट लावावी लागते. आजकाल घरांमध्ये एलईडी लाईट लावण्याचा ट्रेंड आहे. लोकांना दिवसाही लाईट लावणं आवडतं. परंतु नैसर्गिक सूर्यप्रकाश न घेता सतत लाईट लावणं आरोग्यासाठी चांगलं नसतं. घरात सूर्यप्रकाश येण्यासाठी वाट खुली करावी, उत्तम आरोग्यासाठी सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा आहे.