सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. राज्यातील अनेक भागांत उष्णतेच्या अक्षरश: लाटा पाहिला मिळत आहे. या उष्णतेपासून वाचण्यासाठी थंड पदार्थ, फळे आणि पेय यांना पसंती दिली जाते. त्यात कलिंगड आपल्यापैकी अनेकांनी आणले असेल. काही लोक त्यातील काळ्या बिया खातात तर काहीजण त्या फेकून देतात. पण, तुम्हाला माहितीये का त्याच काळ्या बिया आरोग्यासाठी फायद्याच्या ठरू शकतात. याचीच माहिती आम्ही तुम्हाला आज देणार आहोत.
कलिंगडाच्या बिया फेकून देण्याची चूक करू नका. कलिंगड आवडत नाही असे फार कमी लोक असतील. हे गोड आणि रसाळ फळ उन्हाळ्यात अगदी सहज मिळते. उष्माघाताबरोबरच, ते निर्जलीकरणापासून देखील संरक्षण करते. शरीरात अशक्तपणा जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे होऊ शकतो. कलिंगडच्या बियांमध्ये अनेक प्रकारची खनिजे असतात. या समस्यांसाठी, पूरक आहार घेण्यापेक्षा कलिंगडच्या बिया खाणे चांगले. तसेच, या बियांमध्ये प्रोटीन असते, ज्यामुळे ताकद मिळते.
जर एखाद्याच्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी असेल तर औषध घेण्यापूर्वी या बियांचे सेवन करून पाहा. कलिंगडच्या बियांमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते, जे रक्त निर्मितीस मदत करू शकते. तसेच ज्यांना फिश ऑईल सप्लिमेंट्स घ्यावे लागतात, त्यांच्यासाठी हे फायद्याचे ठरू शकते. ते मन आणि हृदयाला बळकटी देते. पण त्याचे प्रमाण कलिंगडच्या बियांमध्ये आढळते. हे वाईट कोलेस्ट्रॉल देखील कमी करू शकते.