पुणे : उन्हाळ्याचा, तीव्र सूर्यप्रकाशाचा थेट परिणाम त्वचेवर होतो. काही वेळा कोरड्या वाऱ्यांमुळे किंवा काही कारणांमुळे त्वचेची लवचिकता कमी होते. त्वचेचा पोत,त्वचा निस्तेज आणि सैल झालेल्या त्वचेसाठी व्हिटॅमिन ई उपयोगी आहे. व्हिटॅमिन ईमुळे त्वचेला घट्ट करणाऱ्या पेशींचं पुनरुज्जीवन होण्यास मदत मिळते.
व्हिटॅमिन ई मुळे होणारे फायदे-
-व्हिटॅमिन ईमुळे पेशींचं पुनरुत्पादन होण्यास चालना मिळते.
-व्हिटॅमिन ई अँटिऑक्सिडंट म्हणून काम करतं, ताण कमी करून योग्य रक्ताभिसरण होण्यासाठी याची मदत होते.
-सूर्यामुळे होणारं नुकसान रोखण्यासाठी व्हिटॅमिन ईचा उपयोग होतो. त्वचा चमकदार दिसते आणि त्वचेवरचे डाग कमी होतात.
-त्वचेला आर्द्रता मिळते.
-व्हिटॅमिन ई मध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असल्यामुळे त्वचा निरोगी होते.
दरम्यान व्हिटॅमिन ई असलेलं स्किनकेअर ऑइल किंवा व्हिटॅमिन ई कॅप्सूल थेट त्वचेवर लावता येते, यामुळे त्वचेला पोषण मिळतं.