केस गळणे, केस विरळ होणे यांसारख्या समस्या महिलांसह पुरुषांना सतावत असतात. केसांच्या समस्या सोडवायच्या तरी कशा, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. महिलांना केस पांढरे होणं, गळणं, कोंडा यापैकी एक तरी समस्या सतावत असते. यासाठी तुम्ही घरात नेहमी असणारं लिंबू वापरू शकता. लिंबू केसांसाठी खूपच गुणकारी मानले जाते.
लिंबूमध्ये ब आणि क जीवनसत्त्वाचे प्रमाण असते. त्यामुळे केसांना बळकटी मिळते. यात जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे टाळूवरील संसर्ग कमी व्हायला मदत होते. लिंबू आणि इतर घटकांचा वापर करून हेअर पॅक्स तयार करू शकता. लिंबाचा रस आणि कोरफडीचा गर यांचे मिश्रण केसांसाठी खूपच लाभदायी ठरू शकते. केस वाढवण्यासाठी हा पॅक लावता येऊ शकतो. लिंबाचा रस आणि कोरफडीचा गर केसांना लावा. अर्ध्या तासाने धुवून टाका. त्यानंतर शॅम्पू आणि कंडिशनर लावा. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास नक्की फायद्याचे ठरू शकतं.
तसेच केसांची मुळे बळकट करण्यासाठी लिंबू, मध आणि कोरफडीचा गर वापरून पॅक तयार करता येईल. केस आणि टाळूला लावा. 20 मिनिटांनी धुवून टाका. या मास्कमुळे केसांना आवश्यक पोषण आणि जीवनसत्त्वं मिळतील. केसांमधील पोषक घटकांची कमतरता लिंबामुळे निघू शकते.