वाढतं वजन ही एक समस्या ठरू शकते. त्यामुळे वजन कमी करण्याला प्राधान्य दिलं जातं. हे करत असताना व्यायाम असो वा जीम किंवा अन्य काही मार्ग अवलंबले जातात. मात्र, अशावेळी वजन भूक नियंत्रणात राहत नाही. पण, त्यावर असे काही उपाय आहेत ते केल्यास फायदेशीर ठरू शकते.
दररोज पूर्ण नाश्ता करणे हे आपल्या दिवसभराचे पहिले काम समजावे. कमी-कॅलरी किंवा कमी केलेला नाश्ता दिवसभर भूकेची इच्छा वाढवतो. नाश्त्यात जास्तीत जास्त अन्न खाल्ल्याने दिवसभराची भूक कमी होते. आपण संध्याकाळच्या तुलनेत सकाळी जेवणातून 2.5 पट अधिक कार्यक्षमतेने कॅलरी बर्न करतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणाऐवजी नाश्त्यावर भर देणे भूक नियंत्रणात ठेवण्यासाठीच नव्हे तर वजन नियंत्रणासाठीही चांगले आहे.
डार्क चॉकलेट भूक नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. डार्क चॉकलेट देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. चॉकलेटमध्ये बरेच पौष्टिक घटक आढळतात, विशेषत: डार्क चॉकलेट, ज्यामध्ये भरपूर कोको आणि फायबर असतात. यामुळे आपल्याला बराच वेळ भूक लागत नाही. यामुळे ज्यांना भूक नियंत्रणात ठेवता येत नाही. त्यांनी आपल्या आहारामध्ये डार्क चॉकलेटचे सेवन करावे.