आपलं आरोग्य नीट असावं यासाठी अनेकजण प्रयत्न करतात. त्यानुसार, विशेष काळजीही घेतली जाते. पण काही आजार हे बळावतातच. मात्र, अशा काही गोष्टी आहेत त्याकडे विशेष लक्ष दिल्यास पुढील धोका टाळता येऊ शकतो. त्यात शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवणारे काही पदार्थ खाणे टाळावे.
कोलेस्ट्रॉल हा मेणासारखा पदार्थ शरीराच्या पेशींमध्ये आढळतो, जो शरीराच्या कार्यासाठी आवश्यक असतो. मात्र, हाय कोलेस्ट्रॉलमुळे शरीरात त्याचे जास्त प्रमाण हानिकारक असू शकते, ज्याला हायपरकोलेस्टेरोलेमिया देखील म्हणतात. त्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. हिवाळ्यात पदार्थांमध्ये तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अन्नाची चव, पोत आणि सुगंध वाढवते. हे निरोगी फॅटचा एक चांगला स्त्रोत आहे.
तुपाचे जास्त सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी हानिकारक ठरते. विशेषत: नियमित व्यायाम न करता आणि ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. शरीरातील चांगल्या आणि वाईट कोलेस्टेरॉलची पातळी वाढवण्यात किंवा कमी करण्यात तुमचे अन्न महत्त्वाची भूमिका बजावते.
याशिवाय, पनीर हा भारतीय जेवणातील एक लोकप्रिय घटक आहे, विशेषत: पालक पनीर आणि पनीर टिक्का यासारख्या हिवाळ्यातील पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅटही जास्त असते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. त्यामुळे हे टाळणे गरजेचे आहे.