पुणे : महाराष्ट्रात (Maharashtra) उष्णतेची लाट प्रचंड वाढलीय. अंगांची लाहीलाही होत असून या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हाळ्यातील चार महिन्यांतील काही दिवस असे असतात की त्याचे चटके असह्य होतात. अशी उन्हाळ्याची लाट येतच असते. अशावेळी काहीजण डिहायड्रेशनला बळी पडत आहेत. याच दरम्यान एका रिपोर्टमधून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे.
एका रिपोर्टनुसार, उन्हामुळे स्किन कॅन्सरचा (Skin Cancer) धोका वाढतोय. या कॅन्सरला मेलेनोमा कॅन्सर (Melanoma cancer) असेही म्हणले जाते. हा कॅन्सर शरीराच्या त्या भागांमध्ये जास्त होतो ज्या भागांवर कडक ऊन पडतं. सूर्यापासून उत्सर्जित होणा-या अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढतोय. तसेच ज्या लोकांची इम्युनिटी कमकुवत आहे त्यांना स्कीन कॅन्सर होण्याचा धोका वाढतो. इतर देशांच्या तुलनेत भारतात स्किन कॅन्सरचा धोका कमी आहे. कॅन्सरचा धोका विशेषत:मान आणि हातांना जास्त असतो.
कॅन्सर तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येकाने कडक उन्हामध्ये स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. स्वत:ला शक्य तितकं हायड्रेटेड ठेवणे गरजेचे आहे. दुपारी शक्यतो उन्हात जाणे टाळत चला. असेही सांगण्यात आले आहे. सकाळी ७ ते ९ या वेळेतच घराबाहेर पडा. या दिवसात व्हिटॅमिन डी उपलब्ध असतं. आणि त्या नंतरचा वाढलेला सूर्यप्रकाश शरीरासाठी जास्त घातक असतो. कडक उन्हामध्ये बाहेर पडणे टाळा.
ही आहेत स्किन कॅन्सरची लक्षणे
– स्किन कॅन्सरची लक्षणं हे शरीरावरील ज्या भागांवर कडक ऊन पडते तिथे दिसतात.
– जर अंगावर एखादी चामखीळ दिसली तर ते स्किन कॅन्सरचे लक्षणं असू शकतात.
– त्वचेवर पांढरे डाग पडणे, अंगावर खाज सुटणे आणि जखम होणे तसेच त्वचेवर काही बदल दिसले तर ती स्कीन कॅन्सरची लक्षणे असू शकतात.