मुंबई : उत्तम हेल्थसाठी आपण जितकं चालाल तितके चांगले आहे. यामुळे मानसिक यासह शारीरिक आरोग्य सुदृढ राहते. काही जण सकाळी वॉक करतात. ज्यांना सकाळी वेळ मिळत नाही, ते रात्री जेवल्यानंतर शतपावली करायला जातात. वॉक केल्यानंतर पाणी पिण्याची देखील एक पद्धत आहे. खरंतर, या ऋतूमध्ये लोकांना गरम पाणी प्यावं की थंड हे समजत नाही. चला तर मग त्याविषयी जाणून घेऊयात.
नियमित व्यायाम, योग आणि वॉक केल्याने स्नायू मजबूत होतात आणि शरीरातील रक्ताभिसरणही सुधारते, त्वचा तेजस्वी बनते. डॉक्टरांच्या मते, ‘हिवाळ्यात वातावरण थंड असल्यामुळे दिवसभर कोमट पाणी प्यावे. वॉक किंवा वर्कआउट केल्यानंतर शरीरात उष्णता जाणवते. त्यामुळे बरेच जण थंड पाणी पितात. पण वॉक किंवा वर्कआउट केल्यानंतर थंड पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
आपण वर्कआउट केल्यानंतर थंड पाणी पितो तेव्हा, शरीराचे तापमान अचानक बदलते. ज्यामुळे सर्दी, खोकला होऊ शकतो. त्यामुळे कधीही व्यायाम किंवा वॉक करून याल तेव्हा, कोमट पाणी प्या. यामुळे इतर आजार होणार नाही, शिवाय पचनक्रियाही सुधारेल.’
वर्कआउट केल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे फायदे
- वॉक किंवा व्यायाम केल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते.
- वॉक किंवा वर्कआउट केल्यानंतर घाम येतो. बॉडी डिहायड्रेट होते. कोमट पाणी पिल्याने अधिक काळ हायड्रेशन राहते.
- कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते.
- कोमट पाणी हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. शिवाय पचनक्रिया सुधारते.
- व्यायाम केल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने स्नायूंना आराम मिळतो.
- व्यायाम केल्यानंतर कोमट पाणी प्यायल्याने शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.