Papaya Benefit : पुणे : पपई हे फळ अनेक औषधी गुणधर्म आणि पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, अँटिऑक्सिडंट इत्यादी पोषक घटक आढळतात; ज्याचा आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदा होतो.
भूक आणि शक्ती वाढते
पपई भूक आणि शक्ती वाढविते. पपई खाण्याचे खूप फायदे आहेत. शरीराचे वजन नियंत्रणात राहते आणि हृदय व्यवस्थित काम करते. पपई आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. पपई प्रत्येक ऋतूत खाऊ शकतो. पपई केवळ पचनशक्ती चांगली ठेवत नाही, तर हे फळ हृदयासाठीसुद्धा चांगलं मानलं जातं. अशा परिस्थितीत, तज्ज्ञदेखील आहारात पपई समाविष्ट करण्याचा सल्ला देतात, असे त्या सांगतात.
वजन कमी करण्यास मदत
पपई खाल्ल्याने बराच वेळ आपले पोट भरल्यासारखे वाटते आणि आपल्याला भूकदेखील लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यास पपई हे उपयुक्त फळ आहे. नैसर्गिक साखरेचे प्रमाण पपईमध्ये खूप कमी आहे. या कारणास्तव वजन कमी करण्यासाठी आहारात पपईचा समावेश करण्याचा डॉक्टर सल्ला देतात.
हृदय निरोगी
अनेक पोषक तत्वांनी समृद्ध पपईमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. म्हणून पपईच्या सेवनाने एकूण आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. अशावेळी त्याचा वापर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होतो, ज्यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते आणि आरोग्यही निरोगी राहते. हिवाळ्यात पपई खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. पपई खाल्ल्याने आपली प्रतिकारशक्ती मजबूत होते.
फॅट नियंत्रित
पपईमध्ये फायबर, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्ससह अनेक जीवनसत्त्वे असतात. यामध्ये असलेले उच्च फायबर कोलेस्ट्रॉलदेखील नियंत्रित करते. खरंतर पपईच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते. कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यामुळे कमी होण्यास मदत होते.
डॉक्टर सांगतात, पपई खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. म्हणून दररोजच्या आहारात पपईचा समावेश केला पाहिजे. पपई हा आरोग्यासाठी पोषक गुणधर्मांचा खजिना आहे. यामुळे पपई हे एक फळ असले तरी त्याचे शरीरासाठी फायदे अनेक आहेत. आपण आपल्या आहारात पपईचा समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे आपल्या शरीराला भरपूर फायदे मिळत असतात.