डॉ. मोनिका भगत
पुणे प्राईम न्यूज डेस्क: शरीरातील उष्णता वाढली की आपल्या आरोग्यावर याचे परिणाम दिसू लागतात. काही सौम्य तर काही गंभीरही समस्या उद्भवू शकते. उष्णतेसोबतच तोंड येण्यासाठी अनेक कारणं असू शकतात. यामध्ये अनेकदा पोट साफ न होणं किंवा पोटातील उष्णता, ताण आणि हार्मोनल बदलांमुळेदेखील तोंड येण्याची शक्यता वाढते. पण असे काही घरगुती उपाय आहेत त्याचा अवलंब केल्यास नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
तोंडात फोड येणं म्हणजेच तोंड येण्याची समस्या ही तशी सामान्य आहे. मात्र, या सामान्य समस्येमुळे देखील काही दिवस त्रास सहन करावा लागतो. साधारण गालांच्या आतल्या त्वचेवर, हिरड्यांवर तसेच ओठांना आतून तोंड येतं. यामुळे काही दिवस वेदना होतात. खाण्या-पिण्यास त्रास होतो. खास करून गरम किंवा तिखट पदार्ख किंवा पेय पिण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते.
अनेकदा अगदी एक दोन दिवसात हा त्रास कमी होतो. मीठ हे डिसइन्फेक्टंट म्हणून प्रभावी आहे. यासाठी कोमट पाण्यामध्ये चमचाभर मीठ मिसळून दिवसातून दोनदा गुळण्या कराव्या. मीठातील अँटीबॅक्टेरियल गुणांमुळे मायक्रो-ऑर्गेनिज्मचा बंदोबस्त होऊन तोंड येण्याच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. तोंड आल्यावर तोंडामध्ये वेदनाही होतात. यासाठीच लवंग उपयुक्त ठरू शकते. लवंगात असलेल्या अंटी-बॅक्टेरियल आणि एनाल्जेसिक गुणांमुळे तोंडातील जखामांचं कीटाणूंच्या संसर्गापासून बचाव होतो. लवंग चघळल्याने वेदना कमी होऊन तोडं येणं लवकर कमी होऊ शकते.
(लेखिका या कान, नाक, घसा तज्ञ व सर्जन असून विश्वराज हॉस्पिटल लोणी काळभोर येथे कार्यरत आहेत)