पुणे प्राईम न्यूज डेस्क: सध्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक गोष्टी झपाट्याने मिळवण्याचा प्रयत्न असतो. त्यात अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचीही भर पडली आहे. परिणामी, स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. पण याच स्मार्टफोनचा अतिवापर तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतो. त्यामुळे वेळीच काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
स्मार्टफोनचा अतिवापर कायम धोक्याचा राहू शकतो. त्याचा तुमच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे संभ्रमही निर्माण होऊ शकतो. लहान मुले जर फोनवर जास्त वेळ घालवत असतील तर ते अभ्यासाकडे नीट लक्ष केंद्रित करू शकणार नाहीत. स्मार्टफोनचा जास्त वेळ वापर केल्याने डोळ्यांच्या दृष्टीवर नकारात्मक परिणामही होऊ शकतो. त्यामुळे डोळ्यांना कोरडे पडण्याची समस्या उद्भवू शकते.
तसेच रात्री झोपण्यापूर्वी साधारण एक तास आधी स्क्रीन लावणे टाळावे. याशिवाय मोबाईलचा वापर करताना डोळ्यांना चष्मा लावावा. जेणेकरून डोळ्यांना होणाऱ्या नुकसानापासून वाचवता येऊ शकेल. स्मार्टफोनचा सतत वापर केल्याने डोकेदुखी आणि मायग्रेनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मेंदू चांगला ठेवण्यासाठी स्क्रीन टाईम कमी करायला हवा. या सर्व बाबींची काळजी घेतल्यास याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.